हज दरम्यान मिळालेल्या अनुभवांनी मला सहनशीलता आणि नम्रतेचं खूप मोठं शिक्षण दिलं.
✈️ पहिला विमान प्रवास: मुंबई ते कुवैत
या प्रवासाची सुरुवात झाली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून. माझा हा पहिलाच विमानप्रवास होता, आणि त्यामुळे हृदयात गोंधळलेलं उत्साहाचं आणि थोड्याशा काळजीचं वातावरण होतं. एअरपोर्टच्या तिकीट काऊंटरवर पोहोचलो, तिथे बॅगेजचे वजन चेक झाले, आम्हाला तिकीट आणि बोर्डिंग पास दिला. विमानतळ आहे म्हणून इंग्रजीमध्ये त्यांना एक विनंती केली, "I’m traveling by plane for the first time. If a window seat is available, could I have it, please?" अशी विनंती करून त्यांनी मला विंडो सीट दिली. मग आम्ही थोडावेळ waiting area मध्ये बसलो. विमानात बसण्यापूर्वी दोन रकात नमाज अदा केली. बोर्डिंग पास आणि तिकीट घेऊन विमानात प्रवेश केला.
![]() |
| (Dinner) |
कुवैत जवळ आलं आणि-"The plane needs to be refueled. All passengers are kindly requested to proceed towards the airport ground." अशी सूचना आली. आम्ही सगळे आपापले hand-bag घेऊन airport ground ला आणि विमानाजवळच उभ्या असलेल्या बसमध्ये बसून airport mdhe एन्ट्री केली.
कुवैत इंटरनॅशनल एअरपोर्टवर नमाज पढण्यासाठी स्पेशल रूम आहे, तिथे सकाळची नमाज अदा केली. Finally, fuel भरून झाल्यावर reaqust कॉल आला की "Attention please: Dear passengers, Passengers traveling on Flight Number J9203 of Jazeera Airways from Kuwait to Jeddah are kindly requested to proceed to Gate Number 12. Your flight is ready for depart". आणि आम्ही पुन्हा त्याच उत्साहाने विमानात बसलो.
![]() |
| (Kuwait International Airport) |
![]() |
| (Kuwait City) |
![]() |
| (Turbulence) |
![]() |
| (ढग जणू कापसासारखे दिसत आहेत) |
जेद्दा airport वर land होताच, आपुलकीच्या ठिकाणी आल्यासारखे वाटले. इस्लामिक state चा झेंडा जणू आमचा स्वागत करत होता. Airport वर उतरलो, bags घेण्यासाठी थांबलो आणि bags चेकिंग झाल्यानंतर airpprt च्या बाहेर आलो.
🚌 जेद्दा ते मक्का: सौदीच्या रस्त्यांवर
![]() |
| (Jeddah Airport bus terminal) |
![]() |
| (Durratul Munawwara Travels) |
🕋 मक्केतील 10 दिवस: आत्म्याचं शुद्धीकरण
आमचा हॉटेल आधीपासून बुक होताच, रूमवर जाऊन fresh झालो, जेवण करून 'अहेराम' (काबाचे (तवाफ) फेरे मारण्यासाठी घातला जाणारा पोशाख) काबा पाहायला निघालो, excitement तर खूप होती, ती शब्दात नाही सांगू शकत.
![]() |
| (Kaba) |
![]() |
| (Makkah Clock Tower) |
![]() |
| (Masjid-al-Haram) |
आणि शेवटी काबा पाहिला, इतके वर्ष मोबाईल आणि टीव्हीवर पाहिलेला पवित्र स्थळ अगदी डोळ्यासमोर होता, मला विश्वास होतं नव्हता की मी माझ्या डोळ्याने हा स्थळ पाहतोय, हे बघताच डोळ्यांत अश्रूंचे येणं सुरू झाले, ते आनंदाचे होते की कसले ते कळत नव्हते, याच दरम्यान मी एक (सात चक्कर) पूर्ण केले. पुढे सफा-मरवा हे दोन डोंगर आहे, जिथे जमजम या पवित्र पाण्याचा स्रोत आहे, तिथे नमाज अदा केली.
मक्का शहरामध्ये आम्ही १० दिवस राहिलो. मक्काच्या 'मस्जिद-अल-हरम येथे नमाजचे पठण केले, या मस्जिदमध्ये एकदा नमाज अदा केली की, १ लाख वेळा नमाज पढण्याइतकं पुण्य आहे. दररोज पहाटे ३-४ वाजता हॉटेलच्या बाहेर जाऊन बसची वाट पाहायचो. हज यात्रेसाठी आलेल्या हाजीसाठी उपलब्ध असलेल्या फ्री बस सेवेचा मी भरपूर उपयोग केला. त्यामुळे आम्ही अर्धं मक्का शहर फिरून काढलं असावं ! तेथील मोफत जेवण, पाणी आणि मुख्य म्हणजे खजूर यांचा भरपूर आस्वाद घेतला, तेथील स्ट्रीट food चाही आनंद घेतला. तिथे विविध देशांची लोकं पाहायला मिळाली, इंडोनेशिया, चायना, बांगलादेश, इराण, आफ्रिका, झिम्बाबवे असे खूप दूरवरून हाजी लोकं आले होते.
🕌 तीन उमराह: वेगवेगळ्या स्थळांवरून
या १० दिवसांत तीन उमराह करण्याची संधी मिळाली:
पहिला उमराह – प्रसिद्ध मस्जिद-ए-आयेशा येथून.
![]() |
| (First Umrah) |
तिसरा उमराह – थोडं लांब असलेल्या मस्जिद-ए-जुराना येथून.
काबाच्या सभोवती केलेला तवाफ (७ फेऱ्या), सफा-मरवा मधील सई, आणि झमझम पाण्याचा अनुभव — या प्रत्येक क्षणात माझं मन भक्तिभावात ओथंबून निघालं.
🏞️ जियारत म्हणजेच इस्लामिक ऐतिहासिक स्थळांची भेट-
तैफ, जबल-ए-उहद, जबल-ए-मलायका, ग्राउंड ऑफ अरफात — ही सर्व ठिकाणं पाहताना इस्लामी इतिहासाचा ठसा मनावर उमटत होता. त्या जागांवर पाय ठेवणं म्हणजे जणू आपल्या इतिहासाशी प्रत्यक्ष संपर्क येणं होतं.
![]() |
| (Masjid in Taif city) |
![]() |
| (Toyota corolla old) |
![]() |
| (Taif city bus terminal) |
![]() |
| (First one minar masjid in islam) |
![]() |
| (Vision 2030 KSA) |
✈️ मक्का ते मदिना: हृदयाची दुसरी घर
१० दिवसांचा मक्का प्रवास झाल्यावर आम्ही सौदी एअरलाईनच्या विमानाने मदिनाकडे निघालो. हा प्रवास ४५०-४६० किलोमीटरचा असला तरी मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती – कारण हे ठिकाण आहे प्रेषित मोहम्मद (स.अ.) यांचं शहर.
🕌 मदिनामधील ५ दिवस: शांततेचं शहर
मदिनामध्ये आम्ही ५ दिवस थांबलो. मस्जिद-ए-नबवीचं दर्शन घेणं आणि रियाजुल जन्नत मध्ये नमाज पठण करणं — हा अनुभव म्हणजे खरं तर स्वर्गाच्या जवळ जाण्यासारखाच होता.
![]() |
| (Masjid-e-Nabavi) |
![]() |
| (Folding day/night sensored Umbrella) |
![]() |
| (Rawda-e-Rasool) |
![]() |
| (Masjid build by Prophet,Masjid-e-Quba) |
त्याठिकाणी मिळालेली शांतता आणि आत्मिक समाधान शब्दांत मांडता येणार नाही.
🏁 परतीचा प्रवास: झमझमचा आशीर्वाद
आणि अशा रीतीने १५ दिवस पूर्ण झाले. १५ दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर आम्ही बसने जेद्दा
एअरपोर्टकडे रवाना झालो. तिथे सर्वांनी जमजम पाण्याचे जार घेतले – जे केवळ पवित्रच नाही, तर या प्रवासाची आठवण जपणारा खजिनाच आहे.
कस्टम चेकिंगच्या रांगेत उभं असताना मनामध्ये समाधान, आठवणी, आणि थोडी उदासी — हे सगळं एकत्र मिसळलं होतं. कारण एकदाचा हज झाला होता… आणि आता परतण्याची वेळ आली होती.
![]() |
| (King Abdul Aziz International Airport,Jeddah) |
🙏 शेवटचं मनोगत
हज यात्रा केवळ एक प्रवास नाही, ती एक आध्यात्मिक पुर्नजन्म आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक फेरी, प्रत्येक नमाज — हे सर्व मला एक नवीन चांगला मुलगा बनवून गेलं. हज करताना मिळालेल्या अनुभवांनी मला विनय, सहनशीलता आणि नम्रतेचं खूप मोठं शिक्षण दिलं.
जर तुम्हालाही तिर्थक्षेत्राला जायची इच्छा असेल, तर प्रार्थना करत राहा, कारण देव योग्य वेळी तुमचंही स्वप्न पूर्ण करतोच.






























Comments
Post a Comment