एसटीच्या रात्रप्रवासात उगवलेली मैत्रीची पहाट
मित्र किंवा मैत्रीण कधी आणि कुठे भेटेल हे कोणालाच ठाऊक नसतं. काहींना ऑफिसच्या कॅंटीनमध्ये भेटतं, काहींना पुस्तकांच्या लायब्ररीत,काहींना सोशल मीडियावर, तर काहींना प्रवासात. असंच माझी एका अनोळखी मुलीसोबत झालेली ओळख, लांब पल्ल्याच्या मुंबई-अमळनेर बसमधून भिवंडी ते नाशिक प्रवास करताना.
“मुंबईतील गजबजलेल्या सेंट्रल बसस्थानकवरून एक बस निघाली, तिचं गंतव्य होतं अमळनेर. बस दादर, कुर्ला, ठाणे थांबे घेत भिवंडी बसस्थानाकात पोहोचली.
मी भिवंडी बसस्थानकात मुंबई-अमळनेर बसची वाट पाहत उभा होतो, बसस्थानकात नाशिक,मालेगाव,जळगाव जाणारे खूप प्रवासी उभे होते, तेवढ्यात माझी बस आली, बसचा आवाज normal नव्हता,अगदी एखाद्या जनरेटर सारखा. मला जाणीव झाली की बसमध्ये काहीतरी गडबड असावी. या बसनंतर अजून एक बस आली, मुंबई-जळगाव; ती स्लीपर बस होती म्हणून तिचे प्रवासभाडे थोडे जास्त होते, आणि तेथील प्रवासी आमच्याच बसमध्ये बसले. जागा पकडण्यासाठी प्रवाशांची तडफड सुरू होती. त्यात मी,एक एसटीप्रेमी; माझा कामच निवांतपणे अगदी “घाई नाही, चिंता नाही” या टाइपचा., सीटचा आरक्षण केला होता म्हणून सीट मिळणार नाही याची भीती न बाळगता बसमध्ये चढलो, माझ्या सीटवर जाऊन बसलो. माझ्या सीटच्या बाजूला एक मुलगी बसली होती, तिला विचारल्यावर कळलं तिने सुद्धा सीटचा reservation केला होता. तिला बाजूला सरकायला सांगितले,आणि माझी बॅग रॅकवर ठेऊन आसन ग्रहण केले. तिला विचारले असता कळालं की, ती अमळनेरला आपल्या आजी-आजोबांकडे जात होती. कदाचित ती मुंबई वरून बसली असावी, असंच बोलता तिला तिचं नाव विचारता कळालं तिचं नाव श्रद्धा आहे. बसला निघायला थोडा उशीर होता म्हणून मी बसच्याखाली उतरलो, बसचा फोटो क्लिक केला आणि परत बसमध्ये जाऊन बसलो.
शेवटी सगळे प्रवासी बसमध्ये बसले,चालकाने बस स्टार्ट केली,बस निघाली आणि प्रवास सुरू झाला.
आता बस हायवेला जोडणाऱ्या खडबडीत रस्त्यावरून जात असताना तिच्या हातातील पाण्याची बॉटल माझ्याच्या अंगावर सांडले. "सॉरी, खरंच माफी मागते," ती घाबरत म्हणाली. "काही हरकत नाही, असं होतं कधी कधी," मी हसत उत्तर दिलं. या नंतर,हळूहळू आमचं संभाषण सुरू झालं.
आता बस शहापूरला पोहोचली. रात्रीची बस म्हणून जास्त प्रवासी चढले नाही. कंडक्टरने बेल मारली, आणि चालक दादाने गाडी स्टार्ट केली. बस स्टार्ट करत असताना अचानक डिझेल बसच्या बोनेटमधून डिझेल बाहेर आले,बोनेट उघडून बघितला असता,इंजिनपर्यंत डीझेल पुरवणारा पाईप फुटला होता. चालक काकांनी क्षणाचा विलंब न करता शहापूर डेपोचा रस्ता गाठला. तसा बसस्थानक आणि डेपो जवळ-जवळच, डेपोत गाडी नेली, चालक काकाने गाडी Rampवर नेली, " बसच्या बाहेर कोणी उतरू नका" असे वाहक काकाने सूचना दिली. तेथील Mechanic स्टाफला डीझेल पाईप दाखवला, त्यांच्याकडे पाईप उपलब्ध नव्हते,मग त्यांनी काहीतरी जुगाड करून पाईप बसवला व गाडी मार्गस्थ करायला सांगितले, गाडी ब्रेक-डाऊन असल्यामुळे गाडी काही जास्त पळवू नका, असे तेथील Mechanic बोलले, आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
आता शहापूर सोडून अर्धा तास झाला होता आणि त्या अर्ध्यातासानंतर आमची बस मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या "हॉटेल हायवे फेमस" या एसटीच्या अधिकृत थांब्यावर जेवणासाठी थांबली. "गाडी २०-२५ मिनिटे थांबेल", असे चालक काकाने बोलून गाडी बंद केली.
बसमधले सगळे प्रवासी जेवणासाठी खाली उतरले,बस रिकामी झाली. आम्ही दोघांनी सुद्धा सोबत चहा घेतला.चहा पीत असताना मला ज्या बसने जायचा विचार केला होता ती बस नेमकी दिसली, चहाचा ग्लास आणि बसचा एक सोबत फोटो घेतला, त्यासोबतच मुंबई-जळगाव, मुंबई-शहादा, छ.संभाजीनगर-बोरीवली आणि असे भरपूर बसचे फोटो काढले. त्यावर तीने मला प्रश्न विचारला,“तू बसचा फोटो का काढला...?, बसविषयी काही तक्रार करायची आहे का..?” “मी इन्स्टाग्रामवर बसचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करतो” मी म्हटलं.
थोड्यावेळात वाहक बसमध्ये आले,त्यांनी डबल-बेल मारली,चालक बसमध्ये बसले आणि प्रवासी आपआपल्या सीटवर जाऊन बसले.वाहकाने प्रवासी मोजले आणि आमची बस निघाली, नाशिक-अमळनेरच्या दिशेने.
बोलता-बोलता आम्ही दोघांनी एकमेकांना सोशल-मीडियावर फॉलो केला.
प्रवास पुढे सुरु झाला आणि आमच्या गप्पा अधिक रंगत गेल्या. मी माझ्या कामाची,आवडीची,स्वप्नांची चर्चा केली. मग तीने सुद्धा तिला आवडणाऱ्या पुस्तकांची, तिच्या आवडी-नावडीची आणि गावातील आठवणी सांगितल्या.
आम्ही दोघेही आपापल्या जीवनातील अनुभव शेअर करत होतो. थोडावेळ शांत बसून परत आमच्या सभाषणाला सुरुवात झाली. आम्हाला जाणीव झाली होती की ही ओळख आता मित्रतेच्या पलीकडे जात आहे.
नाशिक जवळ येत होतं आणि माझ्याच्या उतरायची वेळ जवळ आली होती. बस आधी नाशिकच्या महामार्ग स्टॉपवर थांबली, रात्री १:३० वाजता बस नाशिक मेळा बसस्थानकला थांबली. माझी बॅग उचलली आणि श्रद्धाला म्हणालो, "श्रद्धा, हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास ठरला आहे."
तीने हसत उत्तर दिलं, "माझ्यासाठीही हा प्रवास अविस्मरणीय आहे."मी उतरून गेलो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल वेगळं स्थान निर्माण झालं होतं. तीनेही मला निरोप दिला.
नाशिक बसस्थानकात पोहोचल्यावर अजूनही माझी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) बस आली नव्हती आणि पार्किंगमध्येही कुठे दिसत नव्हती. मेळा बसस्थानकातल्या वाहतूक निरीक्षक ला विचारल्यावर ते म्हणाले “पहाटे ४:१० वाजताची कळमनुरी बस आहे”. या वेळेत फावल्या वेळेत करायचं..? मग विचार केला नाशिकला रात्रीच्या वेळी कधी येणं होणार नाही, या सुवर्णसंधी फायदा घ्यावा. खिशातून मोबाईल काढला, सुरुवातीला ठक्कर बाजार म्हणजेच नवीन मध्यवर्ती बसस्थानकात गेलो. तिथे अंधार तर होताच, बसेस पण काही खास नव्हते, चारही बाजूला त्र्यंबकेश्वर बसेस होत्या. मग परत मेळा बसस्थानकात आलो, सुरुवातीला बोईसर डेपोच्या बसचा फोटो घेतला, मग जळगाव, जामनेर, महाबळेश्वर, शिराळा, वैजापूर,सांगली, पुण्याची शिवनेरी असे भरपूर फोटोचे collection केले. फोटो काढत असताना लोकही माझ्याकडे बघत होते, रात्रीची वेळ म्हणून काही वाद व्हायला नको म्हणून थोडावेळ शांत उभा राहिलो, जणू मी फोटोग्राफी करतच नव्हतो😅.
थोड्याच वेळात एसटीने नवीन घेतलेल्या इलेक्ट्रिक शिवाई बसेस आगमन व्हायला सुरुवात झाली, त्यांचेही काही फोटो क्लिक केले आणि इन्स्टाग्रामवर रील अपलोड करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. तरीही माझ्याकडे अजून अर्धा तास राहिला होता. बसस्थानकात असलेल्या बाकड्यावर जाऊन बसलो. रातराणी बसेसची ये-जा पाहत बसलो. काही बसेस वस्तीला थांबल्या, तर काही बसस्थानकावर थांबून आपापल्या मार्गावर निघून गेल्या.
असंच बघता बघता माझ्या प्रवासाची नाशिक-कळमनुरी बस फलाटावर उभी राहिली. पहिली छ. संभाजीनगर, जालना जाणारी गाडी असल्यामुळे त्या बसला प्रचंड गर्दी होती, पण मला जागा भेटली,तीही केबिनमध्येच,कारण बसच्या केबिनमध्ये कोणी बसायला बघत नाही, धोकादायक असतं म्हणे..!
बसस्थानकावर असलेल्या चहावाल्याकडून चहा घेतला, चालक-वाहक यांनी सुद्धा नाष्टा केला, आणि वाहकाने प्रवाशांची बुकिंग करणे सुरू केली.
पहाटेचे ४:१० वाजले, बस निघायची वेळ झाली होती, वाहक बसमध्येच होते, पण चालक काही कुठं दिसत नव्हते, कंडक्टरने फोन केला असता त्यांचा फोन पण लागला नाही. चालक नाही म्हणून तिथे थांबल्याशिवाय पर्याय नव्हता. ४:१५ मिनिटांनी चालक आले, बस स्टार्ट केली आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा प्रवास सुरु झाला.कंडक्टरने राहिलेली बुकिंग करून घेतली, कंडक्टरने चालत्या बसमध्ये “दोन बेल” मारली, चालकाने बेलचा इशारा समजला आणि बसमधली लाईट बंद केली.मी असंच मागे वळून पाहिले असता, मागच्या सीट्स ह्या रिकाम्याच होत्या, बस सुरूच होती, सीट्सचा आधार घेत शेवटी रिकामी असलेल्या जागेवर पोहोचलो. भिवंडी ते नाशिक प्रवासात झोप झाली नसल्यामुळे थोडावेळ झोप घेतली. थोडावेळ विश्रांती घेऊन, सकाळचे ६ वाजले, बस येवला बसस्थानकात पोहोचली होती, मग थोडावेळ इंटरनेट चालू केला, Notification मध्ये मुंबई-अमळनेर बसमध्ये भेट झालेली श्रद्धाचा मॅसेज दिसला, तीही ऑनलाइनच होती, “आमची बस कुठपर्यंत पोहोचली आणि अजून प्रवास किती करावा लागेल,नाष्टा केला की नाही”, याविषयी चर्चा सुरू झाली. सोबत मोबाईलचा चार्जर नसल्यामुळे तिला मी इन्स्टाग्राम बंद केलं. “ओके ठीक आहे,आपण नंतर बोलू”, आणि प्रवासाच्या शुभेच्छा देत,पोहोचल्यावर मॅसेज कर,असे बोलत तीही ऑफलाईन गेली.
सकाळी येवला बसस्थानकात जास्त काही गर्दी नसते, मग आमची बस थोडावेळ थांबली आणि निघाली. येवला शहरापासून १०-१५ किलोमीटर लांब आलो आणि छ.संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याची हद्द सुरू झाली. रस्ता तसा खडबडीचाच. गाडी रिकामी असल्यामुळे आदळत होती.
आमची बस ७:१५ वाजता वैजापूर बसस्थानकात पोहोचली, चालक-वाहक यांना नाश्ता करायचा होता,म्हणून कंडक्टरने बसची एन्ट्री लवकर करून बस मार्गस्थ केली. बस रोटेगाव,खंडाळा, ह्या लोकल मार्गावर थांबून बस शिवूर बंगला येथील छोट्या हॉटेल वर थांबली. “१०-१५ मिनिटे बस थांबेल” असे बोलत, चालक-वाहक बसच्या खाली उतरले. मी पण फ्रेश झालो; आणि चालक व वाहक यांच्यासोबत चहा,नाश्ता केला. छान असा बसचा फोटो घेतला आणि २५% उरलेल्या प्रवासाला सुरूवात केली.
समृद्धी महामार्ग बघत, १-२ किलोमीटर धुळे-सोलापूर महामार्गावरून जात माळीवाडा,दौलताबाद टी-पॉईंट असे थांबे घेत शेवटी आम्ही शहरामध्ये प्रवेश केला. काही प्रवासी मिटमिटा,पडेगाव येथे उतरली आणि काही नगर नाका आणि बाबा पेट्रोल पंपला उतरली. मीही आपल्या उतरायच्या तयारीतच. बस सिग्नलवर थांबली, माझी बॅग रॅकवरून काढली. सिग्नल सुरू झाला, बस मध्यवर्ती बसस्थानकात बस पोहोचली. बस तशी जालना साईडला जाणारी म्हणून चालकाने बस बसस्थानकच्या फलाटावर लावली नाही. उतरताना “चला,सर येतो पुन्हा भेटू आपण” असं मी म्हटलं; “नक्कीच”, असे वाहकाने उत्तर दिले, हे बोलत मी बसच्या खाली उतरलो आणि तिथे माझा प्रवास पूर्ण झाला...!
पण काहीही असो, मुंबई-अमळनेर या प्रवासात भेटलेली ती नवी मैत्रीण सोबतचा प्रवास अविस्मरणीय होता.या अनुभवावरून कळालं की, चांगले मित्र किंवा मैत्रीण कधीही, कुठेही भेटू शकतात, अगदी एका लांब पल्ल्याच्या बसप्रवासातही...!
...तर असा होता माझा प्रवास !

Comments
Post a Comment